मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांची गर्दी   

येरवडा : सामाजिक कार्यकर्ते यांच्या वाढदिवसा निमित्त अनावश्यक खर्च टाळून येरवडा परिसरातील गरजू रूग्णांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात दंतचिकित्सा, मधुमेह आणि रक्तदाब तपासणी, डोळ्यांची तपासणी केली.शिवाय सर्व रूग्णांना चष्मे देण्यात आले. मोतीबिंदू झालेल्या रूग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपशहर प्रमुख सुनील जाधव, शिवसैनिक आनंद गोयल, विभाग प्रमुख बापू खरात, सुहास कांबळे, तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles